मुनिश्वर बोरकर
संपादक
9421734792
गडचिरोली:-गडचिरोली जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे ११ वे वार्षिक अधिवेशन ९ मार्च २०२५ रोजी शिवाजी महाविद्यालय गडचिरोली च्या सभागृहात उत्साहाने पार पडले. अधिवेशनाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम आरमोरी विधानसभा क्षेत्र यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली चे अध्यक्ष अनिल पाटिल म्हशाखेत्री हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी शिक्षणाधिकारी राजेंद्र मुनघाटे , नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष अनिल बोरागमवार प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे , कोषाध्यक्ष मारोती राऊत , जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल गजभारे , प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष धनपाल मिसार , डॉ. अशोक माथनकर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जगदिश म्हस्के , सचिव रविंद्र समर्थ आदि लाभले होते. याप्रसंगी आमदार रामदास मसराम म्हणाले की ग्रंथालय चालविणे तारेवरची कसरतच आहे. अपुरे अनुदान आदि बाबी माझ्या लक्षात असुन सभागृहात सदर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. अधिवेशनात ग्रंथालय चळवळीचे महत्व विषद करून ग्रंथालय चळवळ घरोघरात पोहचविण्याचे काटोकाट प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अधिवेशनाचे दुसरे अधिवेशन जिल्हा ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष अरुण पाटिल मुनघाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. अधिवेशनात ग्रंथालये वाढविणे , प्रचार आणि प्रसार करणे , अनुदानात वाढ करणे , ग्रंथालयाचा दर्जा वाढविणे आदि विषयावर अधिवेशनात चर्चा करण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य मुकुंदा म्हशाखेत्री , अमृत पिपरे , हरिराम मातेरे , अशोक चव्हाण , प्रियंका म्हस्के , भारती समर्थ , प्रमोद शेंन्डे , अविनाश निकोडे , विकास पाल , संतोष म्हशाखेत्री , भाष्कर चौकशी , जगदिश हरडे, किशोर हरडे, स्वप्नील पिपरे , प्रभाकर पाल , डोमाजी मुनघाटे , रविशंकर चुधरी , प्रभाकर नरुले , देवेंद्र ब्राम्हणवाडे आदिचे मोलाचे सहकार्य लाभले. अधिवेशनात जिल्हातील ग्रंथपाल , मंडळाचे अध्यक्ष सचिव व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते .
