काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार

चंद्रपुर / प्रतिणिधी
चंद्रपुर :- गेल्या काही दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला, ज्यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला होता. पोलीस यंत्रणेवर हल्ले होणे आणि आता काँग्रेस नेत्याच्या घरावर थेट गोळीबार होणे म्हणजे कायद्या व सुव्यवस्थेचे जिल्ह्यात धिंडवडे निघाले आहे.
रविवार, ९ मार्च रोजी रात्री ८ वाजता चंद्रपूर जिल्ह्यात गोळीबाराची आणखी एक घटना घडली.
ज्यामध्ये घुंग्घुस शहराचे काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यावेळी राजू रेड्डी घरी उपस्थित होते. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना घराच्या छतावरून एक गोळी सापडल्याचे वृत्त आहे. रेड्डी समर्थक मोठ्या संख्येने जमले आहेत. या गोळीबारामागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
