✍️मुनिश्वर बोरकर>संपादक
गडचिरोली:-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंन्शी यांचे मार्फत प्रधानमंत्री व राष्ट्रपती यांना निवेदन देऊन आरपिआय व बामसेफ यांनी मागणी केली.
आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर व बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर यांच्या नेतृत्वात एका शिष्ठमंडळानी मागणी केली.अण्णाभाऊ साठे हे शोषित , पिडीत ,श्रमिक , कामगार आणि वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकशाहीर ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा देशाच्या स्वातंत्राच्या चळवळीत अमुल्य योगदान आहे. त्यांचे साहित्य २७ भाषेत प्रकाशित आहे.अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार न दिल्या तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला . निवेदन देतेवेळी प्रा. मुनिश्वर बोरकर , भोजराज कान्हेकर , मारोती भैसारे , प्रमोद राऊत , हेमंत बारसागडे , प्रमोद सरदारे , मोरेश्वर निमगडे , चोखोबा ढवळे , रोषण उके , तुळसिराम सहारे , जिवन मेश्राम , लवकुंश भैसारे , जैराम उंदिरवाडे , दामोदर शेंन्डे नाजुक भैसारे , निशाताई बोदेले , अरुणा उंदिरवाडे , निता उंदिरवाडे , वनिता गेडाम , माया मेश्राम , आम्रणाली रामटेके , प्रेमलता कान्हेकर आदि सहीत रिपाई – बामसेफ चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

