✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना :– कोरपना तालुक्यातील मौजा कोडशी बु येथे नारंडा सर्कल पंचायत समिती काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली. यावेळी खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी उपस्थितांशी संवाद साधून स्थानिक परिसरात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करून जनतेच्या प्रश्नावर अधिक आक्रमक पवित्रा घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
यावेळी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, संभाजी कोवे, दिनकर मालेकर, सुरेश मालेकर, भाऊराव बोर्डे, बंडू पिदुरकर, सचिन मालेकर, विश्वास मालेकर, राहुल मालेकर, गणेश गोडे, अनिल बोंडे, प्रशांत लोढे, निसार शेख, मदन मालेकर, अनिल मालेकर, मार्कंडी वासेकर , वाहाबभाई, रोशन मरापे यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
